Top News

विकासपुरूष मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनात जनतेची अविरत सेवा करणार- भाजयुमो महामंत्री प्रज्‍वलंत कडु #BJP

सुधीरभाऊंच्‍या वाढदिवसानिमीत्‍त १५ भाजपा पदाधिका-यांनी केला नेत्रदान करण्‍याचा संकल्प

सेवा करण्‍याची संधी दिल्‍याबद्दल सर्वरूग्णांचे मानले आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आभार.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- महाराष्‍ट्राचे लोकनेते,माजीअर्थमंत्री, लोकलेखा समितीचे प्रमुख,बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधुन भारतीय जनता पार्टी, महानगर लोकसेवा मदत केंद्राच्‍या माध्‍यमातुन तसेच भाजयुमो महामंत्री प्रज्‍वलंत कडु यांच्‍या नेतृत्‍वात दिनांक ३० जुलै २०२१ रोजी तिरूमला भवन भिवापूर वार्ड,चंद्रपूर येथे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. याप्रसंगी बोलतांना भाजयुमो महामंत्री प्रज्‍वलंत कडु यांनी सर्व उपस्थित रूग्‍णांना सेवा करण्‍याची संधी दिल्‍याबद्दल आभार व्‍यक्‍त करत मा. आ. सुधीरभाऊच्‍या कार्यावर विश्‍वास ठेवुन आपण पुढेही अशीच जनसेवा करण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला.


या नेत्र तपासणी शिबीरात एकुण ३८० रूग्‍णांनी सहभाग घेतला असुन त्‍यामध्‍ये दृष्‍टीदोष असलेले रूग्‍ण २०५ व मोतीबिंदु असलेले रूग्‍ण २६ आढळुन आले. तसेच १५ भाजपा पदाधिका-यांनी नेत्रदान संमतीफार्म भरून दिले व नेत्रदान करण्‍याचा संकल्‍प केला. या नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटण महापौर राखीताई कंचर्लावार, महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,भाजपा नेते प्रमोदभाऊ कडू, भाजपा महानगर महामंत्री ब्रिजभुषण पाझारे, बाबुपेठमंडळ अध्‍यक्ष संदिप आगलावे, नगरसेविका छबूताई वैरागडे, सूरज पेदूलवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या शिबीरात जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. पेंदाम ग्रा.रू.भद्रावती,डॉ.डी. डी. येरमे ग्रा.रू. सावली, डॉ.माधुरी कुलसंगे ग्रा.रू.चंद्रपूर, डॉ.योगेंद्र इंदोरकर समुपदेशक ग्रा.रू. चंद्रपूर यांची उपस्थिती होती.


सर्व उपस्थित वैद्यकीयअधिका-यांना मा. आ. सुधीरभाऊंच्‍या विकासकार्याची पुस्‍तीका सिंहावलोकन,पेन,पुष्‍पगुच्‍छदेवून सत्‍कार करण्‍यात आले.

दिनांक १ ऑगस्‍ट हा प्रज्‍वलंत कडु यांचा वाढदिवस. त्‍यांच्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधुन शिबीरात चष्‍मे लागलेल्‍या रूग्‍णांना चष्‍मे वितरण करण्‍यात आले व रूग्‍णांना मोफत मोतीबिंदु शस्‍त्रक्रिया करून देण्‍याचा मानस त्‍यांनी यावेळी केला. तसेच मागील वर्षी महाशिबीराच्‍या आयोजना दरम्‍यान ज्‍यांनी आपले मतदार फार्म भरून दिले. त्‍यांना शासनाकडुन मिळालेले एकुण १३८ मतदारांचे मतदार ओळखपत्र सुध्‍दा वितरीत करण्‍यात आले.

या दोन्‍ही कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रभागातील भाजप कार्यकर्ते श्रीकांत येलपुलवार,विवेक शेंडे, रिंकेश ठाकरे,आकाश घोटेकर, नितेश वाढई,अनिकेत चौधरी, वैभव बल्‍लेवार,प्रणय घोटेकर, भुषण धकाते,आकाश निकोडे, गौरव निकोडे,आदर्श चौधरी, अंकुश निकोडे,रूपेश खंडाळकर, कुणाल निकोडे यांनी अथक परिश्रम घेतले. #BJP

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने