Top News

सोईसुविधा पुरविण्यासाठी जोगी नगरातील प्लॉट धारकांचे न.प.ला साकडे. #Korpana


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना.
कोरपना:- गडचांदूर येथील प्रभाग क्र.२ मधील जोगी नगरात काही लोकांनी मागील अंदाजे ३ ते ४ वर्षापूर्वी प्लॉट खरेदी केले होते.त्यावेळी रोड,नाली व ईतर मुलभुत सोईसुविधा पुरविण्याची हमी संबंधित व्यक्तीकडून देण्यात आली होती.मात्र अजुनही यातील कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने सदर नगरातील प्लॉट धारकांनी २५ आगस्ट रोजी नगरपरिषद येथे जावुन मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांची भेट घेऊन आपबीती सांगितली व सोईसुविधा पुरविण्याची विनंती निवेदनाद्वारे केली. #Korpana
सविस्तर असे की,गडचांदूर येथील प्रभाग क्रं.२ जोगी नगरातील रहिवासीयांनी कमी दरात विना अकृषक प्लाॅट पुर्वीचे बांधकाम सभापती व आताचे नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी यांच्याकडून खरेदी केले होते.सदरचे प्लाॅट खरेदी करताना उपाध्यक्ष जोगी यांनी असे म्हटले होते की,या प्लॉटची नगरपरिषदेत फेरफार नोंद करून देतो,तुम्हाला शौचालय व घरकुलाची योजना देतो,रोड नालीचे बांधकाम करून देतो,विद्युतची व्यवस्था करून देतो, अशाप्रकारे आश्वासन दिले होते असे या प्लॉट धारकांचे म्हणणे आहे.त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास टाकले व आमच्या मोलमजूरीचे पैसे गोळा करून त्यांच्याकडून प्लाॅट खरेदी केले.त्याठिकाणी आम्ही तीन वर्षापासून आमच्या स्वतःच्या झोपड्या बांधून कुटुंबांसह राहत आहो असे त्यांचे म्हणणे आहे. #Adharnewsnetwork
         
           परंतू यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा अजूनही यांच्या माध्यमातून झालेल्या नाही. राहण्यासाठी पक्के घर नाही,अनेक लोकांकडे शौचालय नाही,विद्युत नाही, सांडपाणी वाहून जाण्यास नाली नाही, ये-जा करण्यासाठी रोडवर साधे खडीकरण नाही.त्यामुळे आम्हाला त्या नगरात राहून जिवन जगणे कठीण झाले आहे.नाल्या नसल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचत असल्याने डासांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे.आरोग्य धोक्यात आले असून विषारी जंतू,कीटक(साप,विंचु) मोठ्याप्रमाणात निघत आहे,विद्युत नसल्याने रात्रीच्या सुमारास सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते, त्यामूळे रात्री घराबाहेर निघने भीतीचे बनले आहे.पावसाळ्यात रस्ते पुर्णपणे चिखलमय असल्याने घरापर्यंत जाने वा घरातून बाहेर निघने कठीण होऊन बसले आहे,घरकुलाचे लाभ घेण्यासाठी नगरपरिषदेत आमच्या नावाची नोंद नाही,त्यामूळे आम्हाला शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.अशाप्रकारची व्यथा या प्लॉट धारकांनी दिलेल्या निवेदनातून मांडली आहे. 
                 
          आमचे जोगी नगरात आपण प्रत्येक्ष भेट देवून आमच्या समस्या जाणून घ्याव्या व सोईसुविधा पुराव्या  अशी विनंती निवेदनातून करण्यात आली असून अन्यथा आम्हाला आंदोलन,मोर्चे,उपोषण अशा संवैधानिक मार्ग अवलंबावा लागेल आणि त्यापासून होणाऱ्या परिणामास सर्वश्री जबाबदारी आपल्यावर राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.आता नगरपरिषद यांना कितपत न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने