भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा. #Rakshabandhan #police

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यांच्या वतीने दुर्गापूर पोलिस स्टेशन मधील पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. भाजपा महिला महामंत्री प्रज्ञाताई बोरगमवार, भाजपा महिला उपाध्यक्ष मंजुश्री कासनगोट्टूवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. #Rakshabandhan #police

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे पार पडला. यावेळी पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. यावेळी भाजपा महिला आघाडी महानगर महामंत्री सौ. प्रज्ञा बोरगमवार, महिला आघाडी महानगर उपाध्यक्ष सौ. मंजुश्री कासनगोटटूवार, भाजपा महिला आघाडी तूकुम मंडळ महामंत्री सौ. सुरेखा बोंडे, सचिव सिंधुताई चौधरी, उपाध्यक्ष मालतीताई लांडे, उपाध्यक्ष सीमा मडावी, गिताताई गेडाम, वर्षाताई सुरांगळीकर, कोपरे ताई, वांधरे ताई, पेचे ताई , संगीता शेरकुरे, घडीवर ताई, बुरान ताई यांची प्रमुख उपस्थिती होती. #Adharnewsnetwork
बहीणभावाच्या मनातील प्रेम भावना जपणारा हा राखी पौर्णिमेचा उत्सव आहे. कोरोना काळात आपण जे कार्य करत आहेत, त्याची परतफेड करता येणार नाही, परंतु या बहिणींच्या रक्षाबंधनाने आपले कर्तव्य बजाविण्यात नक्कीच अधिक बळ मिळेल, म्हणून भारतीय जनता महिला आघाडी तर्फे हा एक छोटासा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन महामंत्री प्रज्ञा बोरगमवार यांनी केले.