🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

टीईटी परीक्षेच्या अंतिम मुदतीच्या आत बी.एड चतुर्थ सेमिस्टरचा निकाल लावा. #Result

महेश कोलावारांची विद्यापीठाकडे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- टीईटी परीक्षेच्या अंतिम मुदतीच्या आत बी.एड चतुर्थ सेमिस्टरचा निकाल लावण्याची मागणी महेश कोलावार यांनी मा.उप-कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांच्याकडे पञाद्वारे केली आहे.#Adharnewsnetwork
नुकताच बी.एड अभ्यासक्रमाच्या चतुर्थ सेमिस्टरच्या परीक्षा झाले असून,कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक महिण्या अगोदर होणा-या परीक्षा एक महिना उशीरा घेण्यात आल्या आहेत.तर दुसरीकडे बी.एड पदविका अभ्यासक्रम पूर्ण होण्या अगोदरच येत्या २७ तारखेपर्यंत बी.एड टीईटी परीक्षेची अंतिम मुदत सरकारनी जाहीर केली आहे.त्यामुळे बी.एड पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेपासून वंचित रहावे लागत आहे.तरी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे हिताचे निर्णय घेऊन टीईटी परीक्षेच्या अंतिम मुदतीच्या आत निकाल लावावा,अशी मागणी महेश कोलावार यांनी केली.#Result

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत