Top News

दोन हजारांची लाच घेताना सापडला ग्रामीण गृहनिर्माण अभियंता. #Arrested

आशिष शिंदेला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली रंगेहाथ अटक.
जिवती:- घोडाअर्जुनी येथील तक्रारदाराचे वडील व आजाेबाच्या नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूलसाठी प्रत्येकी एक लाख ४८ हजार याप्रमाणे २ लाख ९६ हजार रुपये मंजूर झाले होते. घराच्या बांधकामाचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्याने बांधकामाचे एकूण ९० हजार मिळावे, यासाठी त्यांनी पंचायत समिती जिवती येथे देयक सादर केले. #Arrested 
अभियंता शिंदे याने हे बांधकाम पूर्ण झाले की नाही, याची पाहणी करण्यासाठी १४ सप्टेंबर २०२१ रोजी घोडाअर्जुनी येथे भेट घेतली. दरम्यान, बिल मंजुरीसाठी दोन्ही लाभार्थ्यांनी प्रत्येकी एक हजार याप्रमाणे दोन हजार रुपये देण्याची मागणी केली. पंचायत समितीत ही रक्कम आणून देण्याचेही त्याने बजावले.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्यांनी अभियंता शिंदे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दोन हजार रुपयांची लाच घेताना शिंदे याला जिवती पंचायत समितीत अटक केली. पुढील तपास लाचलुचपत विभाग करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने