मोठ्या भावाचा लहानावर चाकूने हल्ला. #Attack

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खून, चो-या, मारहाणीच्या घटना घडत आहेत. दारूबंदीनंतर अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक घटना घुग्घूस मध्ये घडली आहे. #Attack

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

घरगुती भांडणातून मोठा भाऊ आरोपी जितेंद्र समय्या कोंडावार (54) रा. श्रीराम वार्ड, घुग्घुस याने शुल्लक करणावरून वाद घालून लहान भाऊ किशोर समय्या कोंडावार यांच्यावार चाकूने हल्ला केल्याची घटना घुग्घुस येथे घडली.
फिर्यादी सपना किशोर कोंडावार (38) रा. श्रीराम वार्ड, घुग्घुस यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तक्रारी वरून कलम 324, 323, 506,504 गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही भावांचे घर लागूनच आहे त्यामुळे शुल्लक कारणावरून दोन्ही भावात वाद झाला मोठ्या भावाने रागाच्या भारात लहान भावाच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले.