Click Here...👇👇👇

अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम यशस्वी. #Sindewahi

Bhairav Diwase
1 minute read
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- दिनांक 11/09/2021 रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येणाऱ्या मौजा खांडला, शिरकाडा, येथे गणेश उत्सव 2021 निमित्ताने मा. श्री सपोनि योगेश घारे ठाणेदार पो स्टे सिंदेवाही यांचे अध्यक्षतेखाली अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला. #Sindewahi

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक हरिभाऊ पाथोडे सर जिल्हाध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर हे होते. सदर कार्यक्रमांमध्ये भूत, भानामती,करणी, या सारखे विषय घेऊन गावातील लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.
   सदर कार्यक्रमाकरिता गावातील पोलीस पाटील व गणेश मंडळातील युवा कार्यकर्ते तसेच गावातील स्त्री पुरुष यांनी कार्यक्रमाला उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला,  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता देवानंद सोनुले, रणधीर मदारे (गोपनीय) पोलीस स्टेशन सिदेवाही यांनी परिश्रम घेतले.  सदर कार्यक्रमा करिता गावातील लोकांनी माननीय ठाणेदार साहेब यांचे आभार मानले व पुढेही असेच लोकजागर कार्यक्रम घेण्याकरिता शुभेच्छा दिल्या.