अंधश्रध्दा टाळा; गणेश मंडळात झळकले बॅनर. #Bannar

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:-चंद्रपूर जिल्ह्यात, जिवती, नागभीड तालुक्यात जादुटोना केल्याचा संशयावरून अमानुष मारहाण झाली. या घटनांनी जिल्हा हादरला. जिल्ह्यात अंधश्रध्दा वाढीस लागली.मानवी मेंदूत भिनलेली अंधश्रध्दा दुर करण्यासाठी गणेश मंडळे सरसावली आहे.अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याची माहीती देणारे बॕनर गणेश मंडळानी लावले.कार्टून चित्राचे वापर करीत तयार केलेले बॕनर भक्ताचे लक्ष वेधत आहेत. #Bannar

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादुटोण्याचा संशयावरून अमानुष मारहाणीचा प्रकार पुढे आला.या प्रकाराने पुरोगामी महाराष्ट्र हादरला.हे प्रकरण ताजे असतांनाच नागभीड तालुक्यात जादूटोणा केल्याचा संशय घेत मारहाण झाली.एकविसाव्या शतकातही मानवी मेंदुत अंधश्रध्दा भिनली असल्याचा प्रत्यय या दोन घटनांनी घडवून दिला. ग्रामीण,शहरी भागात बुबाबाजी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सन 2013 मध्ये शासनाने अंधश्रध्दा निर्मूलन कायदा अमलात आणला.मात्र या कायद्याची माहीती नसल्याने बुवाबाजीचा नादी सर्वसामान्य माणूस लागत आहे.अश्यात धाबा उप पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश मंडळानी अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यातील कलमाचीं माहीती देणारे बॕनर झडकविलेत. राजूरा,गडचांदूर या दोन्ही उप विभागातील गणेश मंडळाचे अध्यक्ष,पोलीस पाटील यांची बैठक घेतली.या बैठकीत अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत चर्चा झाली.अंधश्रध्दा निर्मूलन होईल असे देखावे सादर करण्याचे आव्हान जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी केले.त्यानुसार धाबा उप पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश मंडळानी ठाणेदार सूशिल धोकटे यांची भेट घेतली. अंधश्रध्दा निर्मूलन कायदा जानून घेतला. आणि कार्टून चित्राचा माध्यमातून अंधश्रध्दा निर्मूलन कायदा दर्शविणारे बॕनर झडकविले. हे बॕनर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मंडळाकडून मास्क वाटप.....

एकीकडे अंधश्रध्दा निर्मूलनाबाबत गणेश मंडळे जनजागृती करीत असतांनाच कोरोनाबाबतही काळजी घेतली जात आहे.हिवरा येथिल आदर्श यूवा गणेश मंडळाने मास्कचे वाटप केले.कोरोना बाबतीत आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आव्हान गणेश मंडळे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)