जाहिरात... Advertisement... विज्ञापन

एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यातील त्या युवतीचा मृत्यू. #Murder #chandrapur

महाकाली मंदिर परिसरातील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- 9 सप्टेंबर ला महाकाली मंदिर परिसरात सायंकाळी 6 वाजेदरम्यान बाबूपेठ निवासी प्रफुल आत्राम या युवकाने एकतर्फी प्रेमातून युवतीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता, या हल्ल्यात युवती रक्ताच्याया थारोळ्यात पडली होती, तिच्या छातीवर, पोटावर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या होत्या, पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.


*🔪युवकाने केला युवतीवर चाकु हल्ला.* 
👇👇👇👇👇👇

मात्र युवतीची प्रकृती खालवत असताना तिला नागपूर येथे हलविण्यात आले, मागील 2 दिवसापासून ती व्हेंटिलेटरवर होती व 12 सप्टेंबर च्या रात्री तिची प्राणज्योत मालवली. त्या युवती मागील 3 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होती पण अखेर ती ह्या सिस्टमचा बळी पडली.
18 वर्षीय ती मुलगी गरीब कुटुंबातील होती, खाजगी रुग्णालयात काम करून आपल्या परिवाराचा गाडा चालविण्याचे काम ती करत होती, मात्र अश्या विकृत वृत्तीमुळे त्या मुलीला आपला जीव नाहक गमवावा लागला.
आरोपी प्रफुल आत्राम हा मजुरी चे काम करतो काही महिन्यांपूर्वी तो त्या मुलीच्या घरी कामानिमित्त गेला होता, त्यावेळी प्रफुल ची नजर त्या मुलीवर होती, विशेष म्हणजे प्रफुल हा विवाहित होता, प्रफुल ने तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र त्या मुलीने त्याला भीक न घालता आपल्या कामाकडे लक्ष देणे सुरू केले.
बोलणे बंद झाल्यापासून आरोपी प्रफुल हा चवताळून गेला व 1 सप्टेंबर ला ज्या रुग्णालयात ती काम करीत होती त्याठिकाणी प्रफुल ने तिला भेटण्याचा प्रयत्न केला मात्र तिने नकार देताच प्रफुल अधिक चवताळला व तुला बघून घेतो अशी धमकी देत निघून गेला होता.
ह्या प्रकाराची युवतीने पोलिसात तक्रार सुद्धा केली मात्र प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात न घेता अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
तक्रार होऊनही कारवाई न झाल्याने प्रफुल आत्राम ची हिम्मत वाढली व 9 सप्टेंबरला त्याने महाकाली मंदिर परिसरातील बिअर बार समोर सायंकाळी 6 वाजता त्या मुलीला गाठत तिच्यावर चाकूने सपासप वार केले.
12 सप्टेंबरला मृत्यूशी झुंज देत त्या मुलीने आपले प्राण गमावले.
जिल्ह्यात सुरू असलेल्या या गुन्हेगारी वृत्तीने एका कुटुंबाचा आधारवड हरविला, घरची ती मोठी होती, परिस्थिती हलाख्याची असल्याने काम करून कुटुंब सांभाळण्याचे काम त्या युवतीने केले मात्र प्रफुल आत्राम सारख्या एकतर्फी प्रेमातील विकृताने तिला कायमचे सम्पविले, ह्या घटनेमुळे चंद्रपूर हादरून गेले होते.
12 सप्टेंबरला बाबूपेठ परिसरात घटनेचा निषेध म्हणून नागरिकांनी कॅडल मार्च सुद्धा काढला, युवतीच्या मृत्यूने नागरिकांनी आरोपी प्रफुल आत्राम ला फाशी देण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत