चोरट्यांचा झटका मशीनवर हात साफ.Theft

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- तालुक्यात मागील वर्षीपासून झटका मशीन चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हेटी नांदगाव पुलियापासून हिवरा धाबा नाला पुलिया पर्यंत हिवरा येथील शेतकर्यांचे कपासी शेतशिवार आहे. शेतकरी पिकाच्या सुरक्षेसाठी वन्य प्राण्यांपासून होणारी पिकांची नासधूस टाळण्यासाठी झटका मशीन चा वापर करतात. Theft

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

अशातच मागील वर्षी सुद्धा त्या लगतच्या शेतशिवारातील दोन झटका मशीन चोरीने गेल्या होत्या. काल रात्री च्या दरम्यान  चोरट्यांनी हिवरा येथील शेतकरी शंकर येलमुले यांच्या शेतातील ८५०० रुपये किंमतीची झटका मशीन चोरल्याचा प्रकार घडला. रात्रभर जागली चे संकट टाळण्यासाठी शेतकरी ही उपाय योजना करतात. मग अशा शेतीच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या झटका मशीन चोरट्यांनी चोरल्याने ऐन गरजेच्या वेळी शेतकरी हतबल होतात.  अश्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी शंकर येलमुले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे.