जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वनश्रीच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- वनश्री अशोक आंबटकर ही एका रुग्णालयातून काम आटोपून घरी जात असताना, प्रफुल्ल आत्राम या माथेफिरूने तिला प्रेमाची मागणी घातली. वनश्रीने त्याला स्पष्ट शब्दात नकार देताच, त्याने तिच्यावर चाकूने तीन वार केले.
यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या वनश्रीचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आरोपीविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात वाढ करून ३०२, ३५४ (ड), ३४१ भादंवि, सहकलम १२ पोक्सोअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
चाकू केमिकल ॲनालायझरकडे......

प्रफुल्लने वनश्रीवर चाकूहल्ला करून तिला रक्ताच्या थारोळ्यात टाकून पळ काढला. तसेच घटनेत वापरलेला चाकू गौतमनगरकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला लपवून ठेवला होता. पोलिसांनी प्रफुल्लला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, चाकू लपवून ठेवलेली जागा त्याने दाखवली. पोलिसांनी तो चाकू जप्त करून केमिकल ॲनालायझरकडे पाठविला असल्याची माहिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत