जाहिरात... Advertisement... विज्ञापन

हिंदी राजाभाषा दिवस साजरा. #Hindiday


पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे हिंदी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुशील कुमार पाठक, प्राध्यापक संतोष कुमार शर्मा, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे सर हे उपस्थित होते. #Hindiday

प्राध्यापक संतोष कुमार शर्मा सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हिंदी भाषेचा इतिहास आणि त्या भाषेचा विस्तार कसा करायचा आणि त्या भाषेला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन स्तरावर केले जाणारे उपाय हे उपस्थितां पुढे मांडले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सुधीर हुंगे यांनी हिंदी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमोल गर्गेलवार सर यांनी केले तर संचालन प्रा. सरोज यादव मॕडम यांनी केले तर आभार डॉ, विनोद कुमार सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत