Top News

बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय बालकाचा मृत्यू. #Death #attack


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- जिल्ह्यात दररोज वाघ आणि बिबट्याच्या घटना घडताना दिसत आहेत. कुठे सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना तर कुठे दबा धरून बसलेल्या अवस्थेत हे नरभक्षक वाघ-बिबट पाहायला मिळाले आहे. आज दि.१५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास आष्टी 'कंसोबा मार्कडा' येथील वनविकास महामंडळाच्या क्षेत्र क्र. २१७ मध्ये एका सात वर्षाच्या नरडीचा घोट या बिबट्याने घेतला असल्याची दुर्दैवी घटना उजेडात आली आहे. #Death #attack
मृतक मनोज तिरुपती देवावार हा भंगाराम तळोधी ता. गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथील असून तो आपल्या आजोबाच्या गावी आला होता, दुपारी आईसोबत शेड्या मेंढ्या चरण्यसाटी गेला असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने या मुलावर हल्ला केला दरम्यान आरडाओरड केला असता बिबट्या जंगलात पळून गेला मात्र तो पर्यंत या मुलाचा जीव गेला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने