चंद्रपूर शहराच्या एका हनुमान मंदिराच्या मागे नग्नावस्थेत आढळले महिला व युवक. #Chandrapur

Bhairav Diwase

दारूच्या नशेत असलेल्या दोघांचेही कपडे गायब?
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- अश्लीलता आणि कामवासना मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या मस्तीत सैराट झालेल्या काहींना समाज काय म्हणेल याची भीती आता उरली नाही. असाच एक धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट परिसरातील असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे घडला असून एक युवक व विवाहित महिला नग्नावस्थेत आढळल्याच्या धक्कादायक प्रकार काल दुपारी उघडकीस आला आहे. #Chandrapur

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

काल दिनांक 11 सप्टेंबरला जटपुरा गेटजवळ पंचतेली हनुमान मंदिर जे आता सध्याचे कोविड चाचणी केंद्र आहे त्या मंदिराच्या मागे विवाहित महिला व युवक मंदिराच्या चौकीदाराला नग्नावस्थेत आढळले. दुपारच्या सुमारास मंदिराच्या चौकीदाराला काही मंदिराच्या मागे आवाज ऐकू येत असल्याने त्याने खिडकी द्वारे डोकावून बघितले असता त्याला धक्काच बसला व त्यांनी परिसरातील नागरिकांना याबद्दल माहिती दिली. बघता बघता बघ्यांची तोबा गर्दी त्याठिकाणी जमू लागली, यावेळी पोलिसांना संपर्क साधला मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहचायला 2 तास लावला.
नग्नावस्थेत मद्यधुंद असलेला महिलेला अगोदर कपडे देऊन नंतर तीचेसोबत असलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने ती महिला रेल्वे स्टेशनवर भेटली व आम्ही दोघे दारू पिण्यासाठी या ठिकाणी आलो, त्यानंतर आम्ही दोघेही रात्रभर येथेच असल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्या दोघांच्या संबंधांवरील पडदा हटेल.