जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूर शहराचे नांव देशपातळीवर लौकीकप्राप्‍त ठरावे हाच आपला प्रयत्‍न:- आ. सुधीर मुनगंटीवार. #Chandrapur

नगीनाबाग प्रभागात विकासकामांचे भूमीपूजन संपन्‍न.

चंद्रपूर:-:चंद्रपूर शहराच्‍या नियोजनबध्द विकासाला आम्‍ही नेहमीच प्राधान्‍य दिले आहे. अमृत पाणी पुरवठा योजना ही अतिशय उत्‍तम योजना आहे जेव्‍हा ही योजना पूर्ण होईल तेव्‍हा शहरातील प्रत्‍येक घराला मुबलक पाणी उपलब्‍ध होईल. ताडोबाला आंतरराष्‍ट्रीय वनपर्यटन प्रकल्‍पाचा दर्जा मिळवून देण्‍यासाठी आपण प्रयत्‍न केला आहे. क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीराव फुले, क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या वंशजांना न्‍याय मिळवून देण्‍याचा मी प्रयत्‍न केला. वीर शहीद बाबुराव शेडमाके, लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे, संत जगनाडे महाराज, कर्मयोगी बाबा आमटे यांच्‍या स्‍मरणार्थ पोस्‍ट तिकीट काढण्‍यासाठी यशस्‍वी प्रयत्‍न केले. चंद्रपूर शहराचे नांव देशपातळीवर, जागतीक पातळीवर लौकीकप्राप्‍त ठरावे हाच आपला प्रयत्‍न सदैव राहणार असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. #Chandrapur

दिनांक १२ सप्‍टेंबर रोजी चंद्रपूर शहरातील नगीनाबाग प्रभागातील चोरखिडकी ते सेंट मायकेल शाळा तसेच सुरज ते आनंदे हॉस्‍पीटल पर्यंतच्‍या १,९०,४८,७८०/- कोटी रू. किंमतीच्‍या रस्‍त्‍याच्‍या भूमीपूजन कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखीताई कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, रामपाल सिंह, सभागृह नेता संदिप आवारी, झोन सभापती सौ. छबू वैरागडे, महिला व बालकल्‍याण उपसभापती पुष्‍पा उराडे, सुरेश तिवारी, रोडमल गहलोत, मनपा सदस्‍य प्रशांत चौधरी, राहूल घोटेकर, संजय कंचर्लावार, अनिल फुलझेले, राजेंद्र अडपेवार, शितल आत्राम, विवेक बोढे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी प्रास्‍ताविक उपमहापौर राहूल पावडे यांनी केले. विकासासंबंधी आम्‍ही जी मागणी आ. मुनगंटीवार यांच्‍याकडे केली ती त्‍यांनी नेहमी प्राधान्‍याने पूर्ण केली आहे. त्‍यांच्‍या मंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर महानगराच्‍या विकासासाठी जेवठा निधी उपलब्‍ध झाला तेवढा निधी यापूर्वी कधिही उपलब्‍ध झालेला नाही. आ. मुनगंटीवार आमचे नेते आहे याचा आम्‍हाला सार्थ अभिमान आहे असेही राहूल पावडे यावेळी बोलताना म्‍हणाले. यावेळी आयोजकांनी आ. सुधीर मुनगंटीवार व मान्‍यवरांचे जंगी स्‍वागत केले. कार्यक्रमाचे संचालन मनपा सदस्‍या सविता कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येन उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत