🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहचा सातवा दिवस. #Pombhurna

एकात्म मानववाद चे प्रणेता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम..

केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रामधील बोर्डा बोरकर, कसरगट्टा, आंबेधानोरा, सातारा तुकुम येथे विविध कार्यक्रम संपन्न.
पोंभुर्णा:- दिनांक २५ सप्टेंबर२०२१ ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचा सातवा दिवस साजरा करण्यात आला .एकात्म मानववाद चे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशान्वये केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बोर्डा बोरकर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये सरपंच बालाजी नैताम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कसरगट्टा येथील जेष्ठ नागरिक गणपती कुनघाडकर, दिलीप धोडरे, जयसिंग बघेल यांचा शाल, श्रीफळ, वाकिंग स्टिक काळी, सिंहावलोकन पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. गावातील लहान मुलांना मास्क देण्यात आले. आंबेधानोरा येथे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून खनिज निधी अंतर्गत ग्रामपंचायत भवन च्या परिसर करिता व्हाल कंपाऊंड मंजूर करण्यात आले. त्याचे भूमिपूजन राहुल संतोषवार यांच्या सरपंच सौ.निरंजनाताई मडावी,माजी सरपंच सीताराम मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. सातारा तुकुम येथील जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोली बांधकाम चे भूमिपूजन राहुलभाऊ संतोषवार यांच्या उपस्थितीत सरपंच सौ. शालीना नरेंद्र सिडाम, उपसरपंच श्री.प्रविन दादाजी पेंदोर, यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले

यावेळी उपस्थित ग्रा.प.सदस्य रोशन नैताम, जयंत पिंपळशेंडे, यशवंत ढोंगे, अविनाश ढोंगे, लक्ष्मण गव्हारे, चंद्रशेखर झगडकर, भैरव दिवसे, बुथ प्रमुख श्रीकांत वडस्कर,दादाजी कोवे, उपसरपंच रमेश हलमलवार, गणेश कुंभरे,माया जनगणवार,कविता विलमवार,छायाताई जनगणवार,शोभा रेगुलवार,कुंदाताई जुमनाके, मनीषा हलमलवार श्री.नितीन मोरेश्वर पेंदोर (सदस्य),सौ कविता श्रीदास मडावी (माजी सरपंच) सौ.सिमा अनिल परचाके)(सदस्य) श्री. विनायक चिनाजी पुठ्ठावार (ग्रा.पं.पा.पु.कर्मचारी) श्री.सचिन रतन सिडाम(संगणक परिचालक) अन्य भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत