जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ऑल इंडिया पँथर सेनेची सिंदेवाही तालुका कार्यकारणी गठीत. #Shindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द येथे भानमतीच्या संशयावरून बौद्धांना बांधून डांबून मारल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.त्या घटनेत कुठंतरी बंड करून उठणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातो.हे ऑल इंडिया पँथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या पीडितांच्या घरी जाऊन स्थानिक घटनांचा घटनास्थळी जाऊन अभ्यास केला. त्यानंतर पीडितांच्या न्यायासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले.ही त्यांची माणसांप्रती आत्मीयता व अन्याया विरुद्ध आक्रमक भूमिका त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दाखवून दिली. #Shindewahi

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.


मात्र जिल्ह्यातील कुठलाही स्थानिक कार्यकर्ता हा त्या घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठंतरी कार्यकर्त्यांची उणीव निर्माण झाली.व ती उणीव भरून काढण्यासाठी व जिल्ह्यातील दलित, शोषित, पीडित, वंचित, आदिवासी, मुस्लिम, बहुजन वर्गाच्या न्यायासाठी बंड करून उठायला ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.रूपेश निमसरकार यांनी जिल्ह्यात संगठण मजबुतीकरणाचा पाया रचला.
त्याच माध्यमातून ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्ह्याध्यक्ष मा.रुपेश निमसरकार यांच्या नेतृत्वात सिंदेवाही तालुक्याची कार्यकारणी दिनांक १२ सप्टेंबर २०२१ ला शासकीय विश्रामगृह,सिंदेवाही येथे गठीत करण्यात आली. त्यामध्ये
तालुकाध्यक्ष-आक्रोश खोब्रागडे.
उपाध्यक्ष-जितेंद्र नागदेवते उपाध्यक्ष-महेंद्र कोवले,कार्याध्यक्ष-अंबादास दुधे,महासचिव-सुनील गेडाम,सचिव-यशवंत खोब्रागडे,संघटक-राजेंद्र गेडाम,सल्लागार-डॉ.बांबोळे,प्रवक्ता- मुकेश शेंडे,प्रसिद्धी प्रमुख- वीरेंद्र का. मेश्राम तसेच तालुका युवा कार्यकारणीमध्ये तालुका युवाध्यक्ष- तथागत कोवले,युवा कार्याध्यक्ष-उपकार खोब्रागडे,युवा महासचिव- तेजेंद्र नागदेवते,संघटक -मिथुन खोब्रागडे,युवा प्रसिद्धी प्रमुख - विशाल गेडाम यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाला उपस्थित निमंत्रक भैयाजी मानकर,विशेष अतिथी डांगे साहेब,सहकारी अतुल भडके,सत्यपाल मेश्राम व इतर सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन तथागत कोवले व आभार प्रदर्शन आक्रोश खोब्रागडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत