Top News

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर ने बाप-लेकीला उडवले. #Accident


चिंतलधाबा येथील घटना; मुलगी व बाप गंभीर जखमी.
पोंभुर्णा:- धान कापणीसाठी लागणाऱ्या विळा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुचाकीस्वार बाप लेकीला अवैध वाळू तस्करी करणाऱ्या भरधाव ट्रक्टरने धडक देऊन उडविले असून यात मुलगी व वडिल गंभीर जखमी झाले आहेत.यात मुलीचा डाव्या पायाचा हाड मोडला असून, वडिलाचा उजवा पाय मोडला आहे.सदर घटना ३० आक्टोंबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
पोंभूर्णा तालुक्यात वाळू तस्करांच्या मोठा सुळसुळाट चालू आहे. वाळू तस्कर संबंधित विभागाला न जुमानता दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळूची तस्करी करीत आहेत. वढकुली नाल्यातून अवैधरित्या वाळू चोरी करून चिंतलधाबा येथील एका वाळू तस्करांच्या ट्रॅक्टर क्रमांक MH 34 BG 2315 या ट्रक्टरचे चालक लक्ष्मण नेवारे याने भरधाव ट्रक्टरने धानकापणीसाठी लागणाऱ्या विळा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चेक फुटाणा येथील राजू मेश्राम वय ३८ वर्ष व मुलगी धनश्री मेश्राम वय १० वर्ष हे दोघेही आपल्या दुचाकी क्रमांक (MH 34 R 9943) आपल्या दुचाकीने चिंतलधाबा येथून खरमत कडे जात असतांना जगन्नाथ बाबा मंदिरा नजीकच्या वढणावर त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.यात मुलीच्या डाव्या पायाचा हाड मोडला असून, वडिलाचा उजवा पाय मोडला आहे. जखमी बाप लेकीला तात्काळ पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र दोघांचेही पाय मोडले असल्याने व प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. अवैध वाळू तस्करी करणाऱ्या उर्मट लोकांमुळे निरपराध बाप लेकीचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची गंभीर दखल घेऊन दोषी रेती व्यावसायिकांवर महसूल व पोलीस विभागाने कडक कारवाई करत अश्या वाळू तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळावे अशी मागणी जोर धरू लागली. पोलिस प्रशासन व महसूल कोणती कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने