गडचिरोली:- तुम्ही गडचिरोलीत आल्यापासून अनेक नक्षलवादी मारले गेले, त्याचा बदला आम्ही घेऊ, अशी धमकी ठाणे व गडचिरोली जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे नक्षलवादी संघटनेने दिली.
या घटनेने एकच खळबळ उडाली असून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुंबई, ठाणे, गडचिरोली पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही तपास करत आहेत. या पत्रात 'गडचिरोलीत विकासकामे सुरू केल्यापासून आमची आर्थिक कोंडी झाली आहे. तुम्हाला जवाब दिला जाईल,' असे पत्रात नमूद केले आहे.
धमक्यांना घाबरत नाही!
गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यापासून अशा अनेक धमक्या आल्या आहेत, पण या धमक्यांना मी कधी घाबरत नाही. उद्या मी स्वत गडचिरोली जिह्याच्या दौऱयावर जाणार आहे. गडचिरोली जिह्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा माझा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली.