Click Here...👇👇👇

जिवे मारण्याची धमकी मिळूनही ना. एकनाथ शिंदे गाठलं गडचिरोली.

Bhairav Diwase

दुर्गम भागातील पोलिस जवानांसोबत साजरी केली दिवाळी.
लभामरागड:- राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण या धमकीला भीक न घालता एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड  तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलीस स्टेशनला भेट देऊन जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.
माओवादी कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस जवानांना यावेळी त्यांनी दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. तसेच सिरोंचा तालुक्यातील जिमाका येथील जंगलात ओरीसा आणि छत्तीसगड येथून आलेल्या जंगली हत्तींना संरक्षण मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेऊन चपराळा येथील अभयारण्याची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला याच बरोबर त्यांच्या ताफ्याला जीवे मारण्याची माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. यासंबंधी ठाणे, मुंबई किंवा गडचिरोली गडचिरोली या ठिकाणी कुठेही गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर गृह खात्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या माहितीची शहानिशा केली जात असून एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवली जावी याबाबत विचार केला जात आहे