जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी. #Attack


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोली शहरापासून पूर्वेस ७ किलोमीटर अंतरावरील बोदली या गावालगत वाघाने शेतमजुरावर हल्ला केला. यात हा शेतमजूर गंभीर जखमी झाला असून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. #Adharnewsnetwork
लालाजी मोहुर्ले असे या शेतमजुराचे नाव असून तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. सध्या धान कापणीचा हंगाम सुरू झाला असल्याने लालाजी दुपारी १२ ते १२.३० वाजता दरम्यान गावालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ धानाचे गठ्ठे बांधण्यासाठी शिंदीचे बंध आणायला गेला होता.
अचानक त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. यात त्याच्या मानेवर, खांद्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी गडचिरोलीपासून दहा किलोमीटर दक्षिणेस शिवणी गावात आपल्या शेतात गेलेल्या सुरेश रेचनकर यांच्यावरही वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ जखम झाली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत