(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- नवरात्राचा धार्मिक उत्सव म्हणजे महिलांसाठी एक पर्वणीच असतो. हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि तितक्याच भक्ती भावाने साजरा केला जातो.हा उत्सव भद्रावती शहरातील आर्य वैश्य महिला भजन मंडळाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करुन कौतुकाची थाप मिळविली आहे. #Adharnewsnetwork
येथील आर्य वैश्य महिला भजन मंडळाने नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करून महिषासुर मर्दिनी देवीचे नऊ दिवस स्तोत्र पठण केले. हे स्तोत्र पठण मंडळाच्या प्रत्येक सदस्याच्या घरी सर्व सदस्यांनी मिळून करण्यात आले. मंडळाचा हा उपक्रम मागील पाच वर्षांपासून चालू आहे. त्यांच्या या उपक्रमाचे भद्रावती शहरात अभिनंदन केले जात आहे.
यंदाच्या या उपक्रमात मंडळाच्या स्वाती उपलंचिवार, सारिका पदमावार, भाग्यश्री दैदावार, ममता उपलंचिवार, नम्रता गुंडावार, मंदा गुंडावार, मानसी बोटुवार, अनिता कोटगिरवार, सारिका गुंडावार, ज्योती गुंडावार, प्रिया भास्करवार, निता गुंडावार सहभागी झाल्या होत्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत