वक्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्व करण्याची संधी फक्त भारतीय जनता पक्षात मिळते:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे. #BJYM

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथे भा.ज यु.मो चे फलक अनावरण कार्यक्रम संपन्न.
ब्रम्हपुरी:- राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथील फलक अनावरण कार्यक्रम मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या हस्ते पार पडले. या नंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी भा.ज यु.मो तालुका अध्यक्ष तथा पं. स सभापती रामलालजी दोनाडकर, सरपंच लक्ष्मीबाई सहारे, उपसरपंच गोपाल ठाकरे, देविदासजी कार, मधुकर ढोरे युवा अध्यक्ष जुगणाला शाखा, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननावरे, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्य. सदस्य लिलाराम राऊत, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, उपस्थित होते. यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.