Top News

युवा हा देशाचा पाठीचा कणा आहे:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे

भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी तालुक्यातील वायगाव येथे फलक अनावरण कार्यक्रम संपन्न.
ब्रम्हपुरी:- राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी तालुक्यातील वायगाव येथील फलक अनावरण कार्यक्रम मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननावरे, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, राहुल हजारे, अक्षय माणगुलढे, भोजराज माणगुलढे यांच्या सह भा.ज.यु.मो शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने