Top News

जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीनपट्टे द्या; सुदामभाऊ राठोड यांची मागणी #Jiwati



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील शेतकरी १९५० ते १९५५ पासून शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे तरी आतापर्यंत या क्षेत्रातील भूमिहीन शेतकऱ्यांना जमीनपट्टे मिळालेले नाही ,म्हणून या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही,कारण प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीनपट्टे अनिवार्य आहे.जसे एखाद्या शेतकऱ्यांला व्यवसाय करायचे झाल्यास लोण घेण्यासाठी बँक मध्ये कर्जासाठी अर्ज केला तर तो अर्ज नामंजुर करतात म्हणून साहेब आपले सरकार हे शेतकऱ्यांचे हित जोपासनारी सरकार आहे,म्हणून मंत्री महोदय आपण आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयासमोर आमचे दुःख मांडून जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन द्याल कारण जिवती तालुक्यातील शेतकरी जशी दिवाळी झाली तसेच दुसऱ्या राज्यामध्ये कामासाठी जातात जसे ऊस तोडण्यासाठी हजारो किलोमीटर दूर किंवा मिरची तोडण्यासाठी साठी शेकडो किलोमीटर दूर व कापूस वेचण्यासाठी जातात त्यामुळे लहान लहान मूल शिक्षणापासून वंचित राहतात जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये खूप हाल अपेष्टा येतात एकतर त्यांच्या कडे जमिनीचे पट्टे नाही आहे म्हणून त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही आणि आपल्या उदारनिर्वाहासाठी बाहेर जावे लागतात म्हणूम महोदय आमची मागणी पूर्ण करा अशी विनंती सुदामभाऊ राठोड जय विदर्भ पार्टी कोअर कमिटी सदस्य चंद्रपूर जिल्हा प्रभारी यांनी मा. ना.विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री,इतर मागास, बहुजन कल्याण विभाग,खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन,व पुनर्वसन म.रा.तथा पालकमंत्री चंद्रपूर महाराष्ट्र राज्य यांना केली.
यावेळी उपस्थित सुदामभाऊ राठोड कोअर कमिटी सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी जय विदर्भ पार्टी विशाल राठोड सोशल मीडिया अध्यक्ष चंद्रपूर, निखिल डांगे, विनोद पवार जिवती शहर प्रमुख. सारिका नंदेवार,सचिन मेश्राम, लक्ष्मण खुटेकर, सुरज राठोड,मारोती रिंगत, विजय चव्हाण, संतोष राठोड,रामेश्वर चव्हाण व जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते महोदय आमची मागणी पूर्ण न झाल्यास जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल, त्यामध्ये काही हिंसक घटना घडल्यास त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी दिला आहे.#Jiwati

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने