जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आठ दिवसाच्या आत कामगारांना कामावर घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार:- माजी आमदार अँड संजय धोटे यांचा कंपनीला इशारा. #Rajura


पांढरपौनी आर्यन कोल वाशरीजच्या विरोधात कामगारांचे काम बंद आंदोलन संपन्न.
राजुरा:- आर्यन कोल वाशरीज मागील काही वर्षे बंद पडली होती,मागील काही महिन्या अगोदर ही कंपनी पूर्वरत चालू करण्यात आली,परंतु जुन्या कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही, तसेच कंपनीच्या विविध समस्या संदर्भात आर्यन कोल वाशरीज पांढरपौनी विरोधात राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली कंपनी विरोधात काम बंद करण्यात आले, यावेळी कामगारांच्या मागण्या तसेच कंपनी तर्फे कामगारांना मिळणाऱ्या सोयी सुविधा यावेळी आंदोलना प्रसंगी मागण्या करण्यात आल्या. #Adharnewsnetwork
यावेळी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की आर्यन कोल वाशरीज ही कंपनी कामगारांचे शोषण करत आहे,यापुढे कोणत्याही प्रकारचे शोषण खपवल्या जाणार नाही, जुन्या कामगारांना आठ दिवसाच्या आत कामावर घ्या अन्यथा भाजपचे वतीने तीव्र आंदोलन करणार कामगाराना मिळणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून त्या तसेच कंपनीचे रसायन युक्त पाणी हे नाल्यामध्ये मिसळत असल्याने येथील वातावरण दूषित होत आहे,माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या सोबत बैठक लावण्यात येणार आहे,कामगारांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून कामगारांना कामावर घेण्यात यावे अशे ते बोलताना सांगितले
या आंदोलना प्रसंगी उपस्थित माजी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय मुसळे,भाजपचे नेते निलेश ताजने,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,नगर सेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,भाजपचे संदीप गायकवाड,महादेव तपासे,संदीप शेरकी,संदीप पारखी,गणेश रेकलवार आदी मान्यवरांचे यावेळी मार्गदर्शन केले,
कंपनी विरोधात काम बंद आंदोलनप्रसंगी केलेल्या मागण्या,कंपनीतील जुन्या कामगारांना पूर्वरत कामगार घेणे,कामगारांना नियमानुसार सोयी सुविधा पुरवणे,कामगारांना दुपारच्या वेळी जेवणाची वेळ देण्यात यावी,कामगाराकडून कंपनीद्वारा नियमबाह्य लिहून घेण्यात येणारे हमीपत्र त्वरित बंद करावे व कंपनी कामगारांकडून काम करून घ्यावे व कामगारांवरील अन्याय दूर करावा,कंपनीतील कामगार व सुरक्षा रक्षकांची सिनियरिटी कायम ठेण्यात यावी,कामगारांची गरज भासल्यास पांढरपौवणी,मिठरा किंवा खमोना येथील बेरोजगार युवकांना कामावर घ्यावे,मुठरा नाल्यात कंपनीच्या वतीने सोडण्यात येणारे रसायन युक्त पाणी बंद करावे,प्रदूषणामुळे परिसरातील शेतीचे झालेले नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी तसेच शासन नियमानुसार पांढरपौणी,मुठरा व खमोना या गावांना CSR फंड देवून विकास काम करावी,या सर्व मागण्या घेऊन हे कामबंद आंदोलन करण्यात आले,
या आंदोलनाला यशवी करण्याकरिता भाजपचे युवा नेते संदीप गायकवाड,भाजयुमो जिल्हा सचिव दिलीप गिरसावळे,आनंदराव वैरागडे,राजेश गिरसावळे, मारोती निब्रड, संतोष मोरे,परमेश्वर वैरागडे,श्रीधर जेऊरकर,नागोराव कवळवळे,रमेश वैरागडे,पुडलीक जीवतोडे, संतोष जीवतोडे, गणेश वैद्य,सौ कविता उपरे,शंकर मेश्राम, सौ किरण कुळसंगे,सौ सुवर्णा मडचापे,सौ मंगला व्याहळकर यांनी अथक परिश्रम घेतले,यावेळी पुरुष महिला व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत