"पाहणारे डोळे आणि मदतीचे हात" संस्थेमार्फत रोड ब्रेकर साठी निवेदन. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार गावातील सामजिक संस्था "पाहणारे डोळे आणि मदतीचे हात" या बहुद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोंभुर्णा येथे आज दिनांक १८ ऑक्टोबर ला रोड ब्रेकर साठी निवेदन देण्यात आले.
उमरी पोतदार या गावामध्ये अनेक दिसांपासून जड वाहनांची रहदारी वाढत असल्याने या वाहनांना वेग मर्यादा नसते त्यामुळे गावातील बरेच पाळीव जनावर या वाहनांच्या धडकेत मृत्यू मुखी होत आहे. सोबतच गावालगत बरेच अपघात वाढलेले दिसून येत आहे. यामुळेच या जळ वाहनांची भीती गावकऱ्यांच्या मना मध्ये वाढलेली आहे बरेच गावकऱ्यांनी या विषयाबद्दल ग्रामपंचायतींना सूचना दिलेल्या आहे आणि रोड ब्रेकर लावण्यासाठी ग्रामसभेत सुध्दा या विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. या समस्येची जाणीव लक्षात घेता गावातीलच सामाजिक संस्था पुढे येत मा. उपविभागीय बांधकाम यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून गावकऱ्यांची ही समस्या मांडलेली आहे. या निवेदनाची दखल घेत आपण वरील मागणी पूर्ण कराल हि अपेक्षा घेऊन पाहणारे डोळे आणि मदतीचे हात बहुद्देशीय सामाजिक संस्था उमरी पोतदार आपल्याकडे निवेदन देण्यात आले.
उपस्थित संस्थेचे पदाधिकारी अंकुश उराडे, संदीप यम्पलवार, निखिल झबाडे, निखिल झुरमुरे, भिमराव मेश्राम, चंद्रकांत सिडाम, तेजराज सिडाम आदी उपस्थित होते.