जाहिरात... Advertisement... विज्ञापन

युवा वॉरियर्सच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करा:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे. #Sindewahi

सिंदेवाही येथे भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ता बैठक व शाखा फलकाचा अनावरण सोहळा संपन्न.
सिंदेवाही:- युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाहि गावामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा वारियर्स शाखा फलकाचे अनावरण कार्यक्रम संपन्न झाला व यानंतर कार्यकर्ता बैठक पार पडली. युवा वारियर्स शाखेचे फलक अनावरण भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष माननीय आशिष भाऊ देवतळे यांच्या हस्ते व जि.प समाजकल्याण सभापती मा. नागराजभाऊ गेडाम व भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्रजी बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.


भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांच्या युवा संवाद यात्रेची सुरवात ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून झाली.
या प्रसंगी प्रकाश डेंगे, संदीप डोंगरवार, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे भाजयुमो तालुका अध्यक्ष रितेश अलमस्त, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव पूनेश गांडलेवार, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष रितेश अलमस्त, कामगार नेता मनीष रामील्ला, राहुल कावळे,विनोद कीचक, किशोर गायकवाड,राजू बंसोड,आशिष सहारे, हार्दिक सूचक,रोशन साहरे, भगवान माकोडे,अमोल सिद्दमशेट्टीवार,गिरीश बोरकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत