Click Here...👇👇👇

सोनुर्ली गावात सट्टा क्लब वरती विरूर स्टे. पोलिसांची धाड.

Bhairav Diwase

ठाणेदार राहुल चव्हाण यांचा अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा.
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरात सोनुर्ली या गावा मध्ये सट्टा क्लब वरती विरूर पोलिसांची धाड टाकली. दि. ३ ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास सोनूर्ली गावात 52 पत्ता व कट पत्ता क्लब चालु आहे आणि हिट लोकेशनची गुप्त माहिती मिळताच विरूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण व सह कर्मचारी घेउन मोक्या वरती पोहचून धाड टाकली. 
या धाड सत्रात तीन आरोपी ना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 3, 300 रू.मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना योग्य ती कार्यवाही करण्यात आली असता आरोपींना सूचना पत्रा वरती सोडण्यात आले. ठाणेदार राहुल चव्हाण व त्यांचे मदतगार हेड कॉन्स्टेबल दिवाकर पोवार, बीट हवालदार नरगेवार, प्रमोद मिल्मिले, प्रलाद जाधव, सुरेंद्र काळे, मोकया वरती उपस्थित होते. 
     पुढील कारवाही राहुल साहरे मेजर हे करीत आहे. ठाणेदार राहुल चव्हाण यांनी सिंगम सारखी एन्ट्री या विरूर पोलीस स्टेशनला केली आहे आणि अवैध व्यवसाय वरती योग्य ते कारवाही करून परिसर सुंदर करण्याचे कार्य करीत असल्याचे गावकरी वर्ग  सांगतात त्या साठी गावकऱ्यांनी ठाणेदारांचे आभार मानले.