जाहिरात... Advertisement... विज्ञापन

युवा वॉरियर्स अभियानाच्या माध्यमातून युवकांना भाजपाच्या मुख्य प्रवाहात आणा:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे. #Bramhapuri


भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहराची संघटनात्मक बैठक संपन्न.
ब्रम्हपुरी:- राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी शहरचाही बैठक मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार, कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, स्वप्नील अलगदेवें, शहर सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष प्रमोद बांगरे यांच्या सह भा.ज.यु.मो शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत