🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

सहा महिन्यांनंतर प्रथमच पर्यटकांनी ताडोबा हाऊसफुल्ल. #Tadoba

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- सहा महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर १ ऑक्टोबरपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ताडोबा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. सहाही प्रवेशव्दारांवरून ९२ जिप्सीला प्रवेश देण्यात आला. विशेषत: ताडोबातील टी- १०० वाघासह अनेक वन्यप्राण्यांनी पर्यटकांना दर्शन दिले. प्रवेशाचा शुभारंभ मोहुर्ली प्रवेशव्दारावर नारळ फोडून तसेच फीत कापून करण्यात आला.
कोरोना संकट त्यानंतर पावसाळी सुटीनंतर १ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटनासाठी सुरू झाले आहे. पहिल्यांच दिवशी ताडोबाची ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल झाली होती. सहा प्रवेशव्दारावरून सकाळच्या फेरीत ४१ जिप्सी, १ कॅन्टरला प्रवेश देण्यात आला. तर, सायंकाळच्या फेरीत ५१ जिप्सी व २ कॅन्टरना प्रवेश देण्यात आला आहे. मोहर्ली प्रवेशव्दारावरून गेलेल्या पर्यटकांना टी- १०० वाघाने दर्शन दिले. पुढील महिनाभर ताडोबाचे ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल आहे. कोरोना संकटामुळे पर्यटकांसाठी नवीन नियमावली आहे. त्या नियमांचे पालन करूनच ताडोबात प्रवेश करता येणार आहे.
ताडोबाच्या मोहुर्ली प्रवेशव्दारावर ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक काळे तथा वन विभागाचे अधिकारी, ताडोबातील हॉटेल व रिसोर्ट संचालकांच्या उपस्थितीत नारळ फोडून व फीत कापून पर्यटन जिप्सीला ताडोबा कोरमध्ये प्रवेश देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत