कसरगठा येथील घटना ताजी असतानाच आज वाघाने एका इसमावर केला हल्ला. #Attack #Tigerattackपोंभुर्णा:- कसरगठा येथील घटना ताजी असतानाच आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका इसमावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार राहुल गणपत चव्हाण आपल्या कामावर जाऊन परत येत असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज 3 वाजता पोंभुर्णा-चिंतलधाबा मार्गावर घडली.

राहुल गणपत चव्हाण वय 30 वर्षे असे जखमी चे नाव असुन तो चणकापुर वणी येथील रहिवासी आहे. त्याला जखमी अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे उपचारासाठी दाखल केले. जखमा जास्त असल्याने पुढिल उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत