Top News

दिव्यांग भास्करला मिळाली नवसंजीवनी. #Chandrapur


जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यासह अनेकांनी केली मदत.
चंद्रपूर:- महाकाली मंदिराजवळ चंद्रपूर येथे राहणारे भास्कर सातपुते आणि त्यांची पत्नी हे दोघेही अपंग असून आपल्या तीनचाकी सायकलवर अगरबत्ती व धूप विकून आपल्या पोटाची खडगी भरते. दि.१५/११/२०२१ ला पहाटे ५ चा दरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी भास्करची तीनचाकी सायकल जाळून टाकली. यामुळे त्यांचावर उपासमारीची पाडी आल्याचे वृत्त दी.१६/११/२०२१ ला प्रकाशित झाले. याचा आधार घेत जलसंपदा विभागात कार्यरत गणेश गेडेकर वरिष्ठ लिपिक हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात .त्यांनी ही बाब आपल्या कार्यालयीन मित्रांना व काही सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले.त्यांचा शब्दाला मान ठेऊन व सामाजिक आपलुकीचा भावनेतून पुनम जीवतोडे उपविभागीय अभियंता,अखिल चीडे,स्वाती कुळसंगे सहायक अभियंता श्रेणी-२,बाळू अ पार्ट ऑफ लविंग युनिट चे अमित महाजनवार विस्तार,अमृता महाजनवार अधिकारी,मंगेश पाचभाई,अक्षय दहीलकर सामाजिक कार्यकर्ते,सिध्देश्वर दांडीकवार,विलास नांदे कनिष्ठ लिपिक , आशिष रंगारी यांनी पुढाकार घेऊन भास्करची तीनचाकी सायकल दुरुस्तीचा खर्च व घरगुती किराणा व आवश्यक साहित्य भेट देऊन सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिला.या प्रसंगी या दिव्यांग कुटूंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाळू चे महाजनवार यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने