जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सहल जीवावर बेतली. #Death


३ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
नागपूर:- पाण्याचा अंदाज येत नसेल पाण्यात उतरू नका अशी सूचना वारंवार केली जात असते. पण, बऱ्याच वेळा काही जण नको ते धाडस करतात आणि जीवाला मुकतात. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे.
सहलीसाठी आलेले 3 तरुण कन्हान नदीत पोहोत असताना बुडाले. एकाचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुट्टी असल्यामुळे सहल साजरी करायला कन्हान नदीवर हे तरुण आले होते. पोहता येत नसताना सुद्धा हे तरुण नदीपात्रात उतरले होते त्याच दरम्यान ही घटना घडली.
स्वामी नारायण मंदिर ट्रस्टच्या वर्धमाननगर येथील शाळेतील शिक्षक व कर्मचारी आहे. मौदा तालुक्यातील वढना येथील स्वामींनारायन गोशाळेत सहलीसाठी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सर्वजण आले होते. त्यावेळी १० तरुण गोशाळेला परिसराला लागून असलेल्या कन्हान नदीच्या किनाऱ्यावर गेली होती. काही वेळानंतर सर्व तरुण नदीत पोहण्याकरिता उतरले.
परंतु, बुडालेले तीन तरुण खोल पाण्यात गेले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रशांत राजाभाई पटेल (वय २३ वर्ष, नागपूर, मूळगाव तितलागड ओरिसा) या तरुणाचा मृतदेह मिळाला आहे. तर अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण (वय २१ ), हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया (वय २८) अशी दोन मृतांची नाव आहे. हे दोघे जण अहमदाबाद, गुजरात येथील राहणारे होते.
यातील एकाचा मृतदेह संध्याकाळी सापडला आहे तर दोघांचा शोध सुरू आहे. त्यानंतर बेपत्ता तरुणाचा शोध सुरू करण्यात आला. पण रात्र झाल्यामुळे शोध अपूर्ण राहिला. सकाळी ndrf टीमला बोलावण्यात येणार असून बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात येईल, असं निरीक्षक हेमंत खराबे यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत