जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बल्लारपूर मार्गावर वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. #Tiger #tigerdeath


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- बल्लारपूर मार्गावर बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्राअंतर्गत कारवा 1 बिटातील कक्ष क्र. 500 मध्ये दि. 27/11/2021 रोजी वाघ मादी अंदाजे 5 ते 6 वर्ष मृतावस्थेत आढळुन आली. मृतदेह 3 ते 4 दिवसापुर्वीचे असुन वाघाचे शवविच्छेदन राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचे प्रतिनिधीं डॉ. विलास ताजणे पशुधन विकास अधिकारी व डॉ. कुंदन पोडचेलवार पशुवैद्यकिय अधिकारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी पुर्ण केला.
मृत वाघाचे सर्व अवयव सुरक्षित असुन मृत्युचे खरे कारण जाणुन घेण्याकरीता व्हिसेरा सॅम्पल प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून मध्यवर्ती रोपवाटीका कारवा येथे शवविच्छेदनानंतर हन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत