Top News

भद्रावती तालूका युवक काँग्रेस अध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. #Shivsena


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मडावी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे वरोरा-ब्रम्हपुरी विधानसभा संपर्क प्रमुख स़ंजय काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक या धोरणानुसार भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (रै )या गावात शेतकरी नेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम यांच्या उपस्थितीत व तालुका संघटक नरेश काळे यांच्या नेतृत्वात दि.३० ऑक्टोबर रोजी चालबर्डी या गावात शिवसेनेचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमात नरेश काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रदीप मडावी व कांग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यानी तसेच अंकित बावणे व मंजूषाताई उईके या दोन ग्रा.पं. सदस्यानी मा . नितीनभाऊ मत्ते जिल्हाप्रमुख शिवसेना यांचे हस्ते शिवसेनेचा दुपट्टा घालून अधिकृत शिवसेना पक्षात प्रवेश केला . शिवसेना घराघरात पोहचविण्यासाठी नरेश काळे भद्रावती तालुका पिंजून काढत असून यापुढेही असे अनेक पक्षप्रवेश भद्रावती तालुक्यातील प्रत्येक गावात नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शना खाली आयोजीत करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
कार्यक्रमाला माजी सरपंच कवडू नेहारे, नागनाथजी नेहारे, सुरेखाताई नेहारे ग्रा. पं. सदस्य पुष्पा नेहारे, अंकीत बावणे, हेमंत पेंदोर, अभय सोयाम, शुभम सोयाम राकेश तांदुरकर, मयुर पेंदोर, आकाश मडावी, सुरेश तांदूरकर नागोसे, अमित मडावी, अनिल कुळमेथे, मंदताई कुळमेथे, वंदना नागोसे, येशु आरगी हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने