💻

💻

उड्डाणपुलावरून चार चाकी वाहन पुलाच्या खाली कोसळली #accident

चंद्रपूर:- बल्लारशा चंद्रपूर महामार्गावरील राजीव गांधी इंगिनीरिंग कॉलेजचा लगत असलेल्या बाबुपेठ उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने असलेली चार चाकी वाहन पुलाच्या खाली कोसळली असून या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला असून 1 गंभीर तर दोघे किरकोळ जखमी आहे.

चारचाकी वाहन बल्लारपूर येथील टोगरवार यांचे असून वाहन क्रमांक Mh 34 BR 0141 आहे. घटनास्थळी बघ्याची गर्दी जमली होती.

अभिषेक गुप्ता नामक युवकाचा मृत्यू झाला तर उर्वरित मोहन रेड्डी, रोहित नागलवार, चिंटू तोगरवार हे जखमी असून दोघांवर खाजगी तर एकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत