Top News

असा संवेदशील नेता लाभणे हे आपले भाग्यच! #Korpana

कोरपना नगरीत अनुभवायला आला एक अविस्मरणीय क्षण
कोरपना:- सध्या कोरपना नगरीमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आणि प्रचार सभा, रॅली यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला. छोटे-मोठे नेते मंडळीच्या प्रचारसभा जोरात चालू आहे. अशीच सभा कोरपना नगरी मध्ये भाजपा+शेतकरी संघटना+कोरपना शहर परिवर्तन पॅनेलच्या मार्फत आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये एका संवेदशील, सामाजिक जान असलेल्या नेत्याच जिवंत उदाहरण कोरपना वासियांना अनुभवायला मिळाले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्य आकर्षण म्हणून लाभले. सभेदरम्यान त्यांचे भाषण चालू असताना ते अचानक भाषण देण्याचे थांबले. उपस्थितामध्ये एकच चर्चा होती कि, भाऊ का थांबले आहे? पण थोड्याच वेळात सर्वाच्या लक्षात आले. भाषण थांबण्याचे कारण असे होत की, सभास्थळाच्या बाजूला मस्जिद होती. तिथे अजाणचा आवाज ऐकू आला. तेव्हा सुधीर भाऊंनी आपले भाषण थांबवले. आणि जोपर्यंत अजाण संपत नाही तोपर्यंत ते तसेच मंचावर थांबून होते. जेव्हा अजाण संपला तेव्हा भाषणाला पुन्हा पूर्ववत सुरुवात केली. या सर्वामुळे मात्र सुधीर भाऊंनी उपस्थितांची मने जिंकली. यामधुन मुस्लिम समाजाच्या भावनाचा योग्य असा मान राखून आमदार सुधीर मुनगंटीवार संवेदनशील नेत्याचा एक आदर्श उदाहरण आपल्या लाभला. त्यांच्या या कृतीमुळे "असा संवेदनशील नेता आपल्याला लाभला!" "नेता असावा तर असा". आता आपल्याला परिवर्तन ला मत द्यायला काही हरकत नाही. आपण एका चांगल्या नेत्यालाच मत देणार आहो" अशा पद्धतीचे उच्चारण उपस्थितांच्या मुखातून चर्चा सुरू झाली. या सभेला वामनराव चटप माजी आमदार, माजी आमदार ॲड संजय धोटे, सुदर्शन निमकर युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे, वरोरा नगराध्यक्ष एहतेशाम अली तसेच अधिकृत उमेदवार मंचावर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने