💻

💻

गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीत भाजपा विकासाच्या बळावर सत्तास्थानी येईल:- हंसराज अहीर #Gondpipari


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी ही कृतीशील असल्याने विकासाला धर्म मानुन कार्य करते. या पक्षाचे लोकप्रतिनीधी विकासातून आपल्या जबाबदारीचे निर्वहन करणारे आहेत. लोकांनी जेव्हा - जेव्हा सत्तेचा अधिकार दिला तेव्हा - तेव्हा विकासातून या ऋणांची परतफेड करण्याचे कर्तव्य या पक्षाच्या लोकप्रतिनीधींनी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडले आहे. गोंडपिपरी शहराच्या विकासात भाजपा राजवटीमध्ये महत्वपूर्ण योगदान असल्याने भाजपासाठी ही बाब गौरवास्पद आहेे या विकासकामांना घेवून मतदारांपर्यंत पोहोचणे हे प्रत्येक कार्यकत्र्यांचे कर्तव्य असून या कार्यातूनच पक्षाला गोंडपिपरी नगरपंचायती मध्ये विजय मिळेल असा विश्वास पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे.
गोंडपिपरी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजप उमेदवार, पदाधिकारी व कार्यकत्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. राज्यात पूर्व मुख्यमंत्राी देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत जो विकास झाला तो विकास महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शुन्यावर आलेला आहे. विकासाचे सारे चित्राच पालटले आहे. त्यामुळे भाजपा हा पक्षच खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारा असल्याने गोंडपिपरी नगरातील नागरीकांनी या शहराच्या विकासासाठी भाजपाला नगरपंचायतमध्ये एकहाती सत्ता सोपवून शहराच्या सर्वागिन विकासाचा मार्ग मोकळा करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या पक्षीय बैठकीस भाजपाचे ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, तालुका अध्यक्ष बबन निकोडे, किसान आघाडी अध्यक्ष राजु घरोटे, बंडुभाऊ बोनगिरवार, अमर बोडलावार, वैष्णवी बोडलावार, भानेश येग्गेवार, सुनीता येग्गेवार, रवि पावडे, अश्विन कुसनाके, साईनाथ मास्टे, दिपक सातपुते, चैधरी गुरूजी व भाजपाचे सर्व उमेदवार आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत