💻

💻

नैराश्यातून युवकाची आत्महत्या #suicide

चिंतलधाबा येथील घटना
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील एका युवकाने दारूच्या आहारी गेल्याने मानसिक नैराश्यातून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. युवकाने आपल्या राहत्या घराच्या मागे असलेल्या विहिरीत पडून आत्महत्या केली आहे. ओमप्रकाश श्रीहरी उईके वय २५ वर्ष असे आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे.सदर घटना २१ डिसेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास घडली.
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोंभूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुरेश बोरकुटे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत