Top News

गुरुजी #Teacher

पोराले माह्या गुरूजी
शिक्षण असं देजा
माणूस झाला पाहिजे पोरगा
काळजी जराशी घेजा

विज्ञान असं शिकवा त्याले
अज्ञान गेलं पहिजे
सदेह तुकारामाले त्यानं
वैकुंठातून आणलं पाहिजे

इतिहासातून त्यानं
घेतला पाहिजे बोध
शिवरायांच्या मृत्युचा
लावला पाहिजे शोध

सुर्य, चंद्र, तारे
ग्रहणही दाखवा नीट
शनि नसतो लागत कधी
व्हावे त्याच्या डोक्यात फिट

आकड़े मोड भुमिती
करनं शिकवा पटीत
आयुष्याचं विज्ञानातून
मांडलं पाहिजे गणित

ऑनलाइन राहू द्या
ऑफलाईनच शिकवजा
शाहू फुले आंबेडकरांच
कर्तृत्व त्याले दाखवजा

नागरिक शास्त्र शिकवताना
नजरेपुढं ठेवजा भिमाले
धर्माआधी असतो माणूस
समजलं पाहिजे पोराले

✍️ मानकर सर, घुग्गूस

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने