Top News

दोन दिवसांत वाघाने दोन बकरीला केले ठार #tiger #tigerattack

चेक आष्टा गावालगत शेतशिवारातील घटना
पोंभुर्णा:- पोंभुर्णा वनपरिक्षेतात वाघाची दहशत कायम असून कालच चेक आष्टा गावालगत असलेल्या नाल्यालगत वाघाने एका बकरीला ठार केल्याची घटना घडली असता पुन्हा आज वाघाने एका बकरीला ठार केल्याची घटना आता नुकतीच घडली आहे.
पोंभुर्णा वनपरिक्षेतात असलेल्या चेक आष्टा गावालगत असलेल्या नाल्याजवळ काल सुरेश ताजणे यांच्या मालकीच्या बकरीला वाघाने ठार केल्याची घटना घडली. हि घटना ताजी असतानाच आज पुन्हा वाघाने एका बकरीला ठार केल्याची घटना आता नुकतीच घडली असून हि बकरी अमोल कोसरे यांच्या मालकीची आहे. वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास करीत आहेत.
आणखी किती बळी....

याच वर्षी मार्चमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्यांला वाघाने ठार केले होते. मागच्याच महिण्यात कसरगट्टा येथील कापुस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला कविठबोळी शेतशिवारात वाघाने ठार केल्याची घटना घडली. वेळवा येथे फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना हि गोष्ट ताजी असतांनाच काल आणि आज वाघाने बकरीवर हल्ला करत ठार केल्याची घटना घडली. यामुळे पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वाघाचे वाढते हल्ले वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतशिवारात जायला शेतकरी घाबरत आहे.
शेतकऱ्याचे मोठे नुकसान....

परिसरातील शेतकऱ्याच्या शेतीचे फारमोठे नुकसान होत असून शेतकरी वाघाच्या भितीने शेतात न जात असल्यामुळे उभे पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने