Top News

जिल्हा परिषदेच्या आवारातच मांडला जुगाराचा अड्डा #arrested #Yavatmal

झेडपीच्या ८ कर्मचाऱ्यांना अटक
यवतमाळ:- यवतमाळ जिल्हा परिषेदेच्या आवारात जुगार खेळला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुगाराचा अड्डा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू असल्याची माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळली आणि त्याची खातरजमा करुन पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली.
🎂
यावेळी जिल्हा परिषेदेचे 8 कर्मचारी जुगार खेळतांना आढळून आल्याने त्यांच्या वर कारवाई करण्यात आली आहे. या जुगाऱ्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकाश वामन कुद्र पवार, देवनांद विठ्ठल जामनकर, गणेश गोस्वावी, प्रकाश व्यास, गुणवंत ढाकणे, अनिल शिरभाते, संदीप श्रीराम , चरण तारासिंग राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत.

जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय असून या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक आपले काम घेऊन येतात. मात्र त्यांना थातुरमातुर उत्तर देऊन आल्या पावली परत पाठवून कर्मचारी, अधिकारी आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त होऊन जातात. जे कार्यालय ग्रामीण भागाच्या लोकांच्या सेवेसाठी आहे. त्याचठिकाणी आशा जुगार भरवला जात आहे. या जुगार प्रकरणाने जिल्हा परिषेदेचे लक्तरे वेशीला टांगली गेली असून मुख्याधिकारी नेमकी काय भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
🎂

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने