Top News

युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार #chandrapur


पोंभुर्णा:- पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले व विजय प्राप्त केला. त्या सर्व भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा व विकास पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर युवा मोर्चा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोंभुर्णा नगरीचे विकासाचे शिल्पकार आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात जिल्हा महामंत्री मिथलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष मोहन चलाख, पोंभुर्णा शहर उपाध्यक्ष महेंद्र कामिडवार, युवा नेते वैभव पिंपळशेंडे, धीरज गुरनुले, अभय कस्तुरे, नितीन दुम्मावार, प्रीतम मोहुरले, शेष कुमार ढोले, पंकज कोटरंगे, रूपचंद गुरनुले, रुपेश गुरनुले, खुषाल गद्देकार, विशाल गुरनुले, अमन गुरनुले, रोशन गद्देकार, राजकुमार गुरनुले, संतोष गुरनुले, सतीश गव्हारे, प्रमोद चलाख, विकास गव्हारे, सतीश पातळे, महिंद्र सोनुले, सोबतच मौला निषाद, योगेंद्र केवट, शिवाजी बेडदे, संतोष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने