शक्ती कायद्याच्या निमंत्रित सदस्यपदी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची नियुक्ती #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. ५२ महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी विधेयक २०२० यावरील दोन्ही सभागृहांची संयुक्त समितीच्या निमंत्रित सदस्य पदी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हि नियुक्ती २७ जानेवारी २०२२ रोजी उप सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय शिवदर्शन साठे यांनी केली आहे.
आंध्रप्रदेश च्या धर्तीवर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा यासाठी सर्वप्रथम मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनीच केली होती. त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा कायदा समजून घेण्यासाठी आंध्रप्रदेश चा दौरा केला. त्यानुसार आता महाराष्ट्रातही हा कायदा लागू होणार आहे. यांची दखल घेत विधान भवनाच्या विधानपरिषद व विधानसभेच्या दोन्ही सभागृहाने गठीत केलेल्या समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)