Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

चला जाणून घेऊया; चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट #coronavirusचंद्रपूर:- जिल्हयात गत 24 तासात 607 जणांनी कोरोनावर मात केली असून 416 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 75, चंद्रपूर 22, बल्लारपूर 38, भद्रावती 31, ब्रह्मपुरी 54, नागभीड 39, सिंदेवाही 2, मुल 23, सावली 19, पोंभूर्णा 8, गोंडपिपरी 1, राजुरा 13, चिमूर 25, वरोरा 43, कोरपना 17, तर जिवती येथे 6 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 96 हजार 737 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 91 हजार 503 झाली आहे. सध्या 3684 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 41 हजार 333 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 43 हजार नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1550 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत