Top News

वेकोलीतील त्या मृतकाचे कुटूंबियांना 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द #Rajura

राजुरा:- दिनांक 9 फेब्रुवारी रोजी वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत पोवणी कोळसा खाणीच्या चेक पोस्ट क्रमांक दोन जवळ ट्रकचा जॅक उचलीत असताना उच्च विद्युत दाबाच्या विजेच्या तारांना स्पर्श झाला,याच वेळी ट्रकचा पल्ला दाखविताना चालकाचा विजेचा धक्का बसून जागीच मृत पावल्याची घटना घडली लहू रामदास फटाले असे मृतकाचे नाव आहे घटनेची माहिती होताच घटनास्थळी तीव्र आंदोलन झाले होते जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांनी मध्यस्ती करीत तोडगा काढला व आर्थिक मदतीसाठी कम्पनी तयार झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

याची दखल घेत आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी वेकोली च्या कार्यालयात जिल्हापरिषद सभापती सुनील उरकुडे यांचे हस्ते मृतकाचे पत्नी किरण फटाले यांना ट्रान्सपोर्ट कंपनीकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी वेकोली अधिकारी रामकृष्ण रेड्डी, अडव्होकेट प्रशांत घरोटे, अर्जुन पायपरे, रत्नाकर पायपरे, प्रकाश पायपरे, बंटी मालेकर, अरुण मालेकर, अजय निषाद, सचिन गोरे ट्रान्सपोर्ट कँपणीचे अधिकारी व ट्रक मालक उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने