Top News

महिलांना न्‍याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्‍प:- वनिता कानडे #Chandrapur

भाजपा महिला मोर्चातर्फे केंद्रीय अर्थसंकल्‍पाचे स्‍वागत
चंद्रपूर:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्‍प सर्व समावेशक, भारताला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करणारा तसेच महिला सक्षमीकरणावर भर देणारा असल्‍याची प्रतिक्रिया भाजपा महिला मोर्चाच्‍या महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्ष वनिता कानडे यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्‍पाचे भाजपा महिला मोर्चा स्‍वागत करीत असून हा अर्थसंकल्‍प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाभिमुख भुमिका दर्शविणारा आहे. आरोग्‍य, कौशल्‍य विकास, शिक्षण तसेच कृषी क्षेत्राला चालना देणारा हा अर्थसंकल्‍प असून बेरोजगारांना प्रोत्‍साहन देणारा आहे. ‘सबका साथ सबका विकास’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका या अर्थसंकल्‍पातुन प्रामुख्‍याने दिसुन येते.
या सर्वसमावेशक अर्थसंकल्‍पाबाबत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे अभिनंदन करीत असल्‍याचे सौ. वनिता कानडे, सौ. संध्‍या गुरनुले, सौ. राखी कंचर्लावार, सौ. अंजली घोटेकर, कु.अल्का आत्राम, सौ. रत्‍नमाला भोयर, सौ. मिना चौधरी, सौ. रेखा कारेकर, आदींसह भाजपाच्‍या सर्व जिल्‍हा परिषद सदस्‍या, पंचायत समिती सदस्‍या, मनपा सदस्‍या व नगरसेविकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने