Click Here...👇👇👇

नानेश्वर धोटे सेट परीक्षा उत्तीर्ण #Korpana

Bhairav Diwase
कोरपना:- युजीसी अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने २६ सप्टेंबर,२०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सेट परीक्षेत शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील माझी विध्यार्थी नानेश्वर कैलास धोटे या विध्यार्थीने सुयश संपादन केले आहे.
युजीसीमध्ये राज्यातून ७८हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यापैकी ४ हजार ६८० विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.नानेश्वर याने राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथून पूर्ण केले असून,याचे श्रेय त्यांनी आपल्या आई, वडील , कुटुंबातील सदस्य व मित्र परिवार तसेंच नेहमी मार्गदर्शक म्हणून सतत पाठीशी राहणारे श्री शशांक नामेवार व मोठे बंधू जानेश धोटे यांना दिले.सुयश प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिह , प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.