वीज केंद्रातील वाघ, बिबट्याचा तात्काळ जेरबंद करा #chandrapur

Bhairav Diwase
सर्व कामगार संघटनांचा वनविभाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन आवारात मागील अनेक वर्षापासून पट्टेदार वाघ,बिबटे तसेच इतर हिंसक जंगली प्राण्यांचा वावर आहे. वीज निर्मिती केंद्रात कामगारांच्या कामाच्या ठिकाणावर यांचा पट्टेदार वाघ, बिबटे तसेच इतर जंगली प्राण्यांचे वास्तव्य असल्यामुळे वीज केंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचे जीव धोक्यात आहे. कामगारांच्या जिवाचा धोका लक्षात घेता जवळपास सीएसटीपीएस मध्ये असणाऱ्या सर्व कामगार संघटनांनी पट्टेदार वाघ, बिबट जेरबंद करा म्हणून वनविभाग व सीटीएस प्रशासनाला वारंवार निवेदने दिली.

परंतु कोणतीही कारवाई झाली नाही वनविभाग व सीएसटीपीएसच्या उदासीन भूमिकेमुळे दोन दिवसापूर्वीच वीज केंद्रातील कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या कामगारास पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. तत्पूर्वी कामगार संघटनेने पूर्वकल्पना म्हणून निवेदन देखील वनविभाग प्रशासन व सीएसटी पीएस प्रशासनाला दिले होते सदर निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला.

वनविभागाच्या याच उदासीन भूमिका निषेधार्थ सर्व कामगार संघटनांनी व कामगारांनी एकत्रितरीत्या वनविभाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला या मोर्चात हजारोच्या संख्येने कामगार सहभागी झाले वनविभाग कार्यालयावर कामगारांचा आक्रोश मोर्चा धडकला.

वनविभाग व सी एस टी पी एस प्रशासनाविरोधात कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच वाघास जेरबंद करा ही मागणी कामगार संघटनांनी रेटून धरली. आक्रोश मोर्चाची तीव्रता लक्षात घेता चंद्रपूर वनवृत्त चे मुख्य वनसंरक्षक आर. प्रवीण यांनी मोर्चाला भेट देत सर्व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व तत्काळ उपाययोजना करीत असल्याची माहिती दिली या वेळेस मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वनविभाग कार्यालयात लावण्यात आला होता.

यावेळी मनसेचे नगरसेवक तथा मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भोयर, शिवसेनेचे मा नगररसेवक कंत्राटी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष बंडू हजारे, युवासेना कैलास तेलतुंबडे, अमोल मेश्राम, प्रफुल संगोरे, प्रमोद कोल्हारकर, इंटकचे निताई घोष, शिटू वामन बुटले, मनसेचे नितीन भोयर, गजानन जवादे, भारतीय कामगार सेना शंकर बागेसर, मंगेश चौधरी, कामगार क्रांती संघटनेचे रविन्द्र चांदेकर, विजय केळझकर आदी सर्व उपस्थित होते.